Ajit Pawar बनले राज्याचे नवे उपमुख्यमंत्री …

0
561

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी घेतली शपथ ..

राजभवन/मुंबई -२/७/२३

BREAKING : Ajit Pawar महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली .. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्ह्णून गोपनीयतेची शपथ घेतली ..
अजितदादांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली .. यावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी व्यासपीठावर उपस्थित होते …Ajit Pawar

Ajit Pawar
Ajit Pawar
Ajit Pawar

महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना दिली …Ajit Pawar

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here