मुंबई /०३-७-२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राजभवन येथे आज दुपारी झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा


यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी गोपनीयतेची कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली .. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली ..
महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून आजवर वाटचाल केली आहे. याच प्रामाणिक भावनेने आज राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. या पदाच्या माध्यमातून काम करताना शेतकरी, कामगार, कष्टकरी, ओबीसी यांच्यासह महाराष्ट्राचे हित नेहमी सर्वोच्च स्थानी राहील, अशी ग्वाही भुजबळांनी दिली …
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

