AJIT PAWAR:…तर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री दिसला असता -अजित पवार

0
246

AJIT PAWARमुंबई -५/७/२३

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा एका पक्षामध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये आज शरद पवार आणि अजित पवार असे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. 

पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या –

2017 ला प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील बाकीचे वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. समोरून सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांतदादा हे चौघं होती. कोणती खाती, कोणती पालकमंत्री पदं सगळं, मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही. सगळं ठरलं, निरोप आला तटकरेंना दिल्लीला बोलावलं. त्यांच्या वरिष्ठांबरोबर आपले वरिष्ठ मीटिंग झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष आम्ही सोडणार नाही, असं सांगितलं. तेव्हा आमचे वरिष्ठ म्हणाले शिवसेना आम्हाला चालत नाही. भाजप म्हणाले, आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. 2019 ला निकाल लागले, परिस्थिती काय होती माहिती आहे. मोठे उद्योगपतीच्या घरी, आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते पटेल, उद्योगपती भाजपचे वरिष्ठ नेते मी आणि देवेंद्र फडणवीस सगळी चर्चा झाली. पाच बैठका त्याच बंगल्यात झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून बोललो नाही. मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही. हे सगळं सुरू असताना अचानक बदल झाला आणि सांगितलं शिवसेनेसबोत जायचं. २०१७ ला शिवसेना जातीयवादी आणि दोन वर्षांनी ते मित्रपक्ष झाला आणि भाजपसोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही.

AJIT PAWAR

मग फडणवीसांच्या शपथविधीला का पाठवलं ? –
सरकार गेल्यानंतर कामावर स्थगिती आल्या त्या आपल्याला उठवायचे आहे. काही तिकडच्या मिटिंगला गेलेले.
आमदार माझ्या संपर्कात आहे. मी भेदभाव करत नाही. मी दंबग नेता नाही जशी माझी प्रतिमा आहे. मी कोणाशी भेदभाव करत नाही. महिला वृद्ध मुस्लीम सगळ्यांचा विचार करून निर्णय घेईल. सत्तेत राहून लोकांचे प्रश्न सोडवता येत असेल तर का करू, नये. २०१४ ला आम्हाला प्रफुल्लभाईंनी सांगितले आपण भाजपला बाहेरून पाठिंब दिलाय. आम्ही गेलो. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला जा सांगितले आम्ही गेलो. त्यांच्या बरोबर जायचे नव्हते तर हे का जाण्यास सांगितलं?

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शरद पवारांकडे आमचे काही आमदार गेले –
16-16-16 चा फॉर्म्युला शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीमध्ये ठरत होता. नितीन गडकरींची इच्छा होती, पण काही आरोप होते म्हणून हे पुढे काही झालं नाही. आजही काही आमदार तिकडे मिटिंगला गेले आहे, ते आमच्याकडे येतील ..

AJIT PAWAR

तेव्हा 4 खाती जास्त घेतली –
2004 ला आपले 71 आणि काँग्रेसचे 69 आमदार आले. त्यावेळी मला मोठं स्थान नव्हतं. सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद द्यावं लागेल. विलासरावांनी विचारलं तुमच्यात कोण होईल? भुजबळसाहेब आर.आर.पाटील प्रमुख नेते म्हणून काम करत होते. माझी त्यावेळी इच्छा नव्हती, कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. सगळं आपल्याला मिळालं पाहिजे, असा हव्यास कुणी ठेवू नये. ती संधी मिळाली असती तर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री आजही तुम्हाला दिसला असता. पण चार खाती जास्त घेतली..

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तर आज राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता –
त्यावेळी संपूर्ण मैदान भुजबळ साहेबांनी गाजवले.मला फक्त ७ जील्ह्याचे खातं दिले.मी सकाळी लवकर उठतो रात्री उशिरापर्यंत का करतो का तर महाराष्ट्र पुढे गेले पाहीजे.
मी खूप छोटा कार्यकर्ता होतो. पण माझा प्रशासनावरची पकड कशी आरे सगळ्यांना माहिती आहे. संधी आली होती. तेंव्हा मिळाली असती तर आज राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असता..
मी साहेबांच्या छत्रछायेत घडलो –

मी साहेबांच्या छत्रछायेत घडलो यात मला तिळमात्र शंका नाही.लोकांना न्याय देण्यासाठी मी आलो आहे.मी इतिहासांत जाणार नाही. पण साहेबांनी 78 ला पुलोदचे सरकार स्थापन केले नंतर आम्ही राजकारणात आलोत. पुढे सगळ्यांनी साथ दिलीं..इतिहास बघितला तर आपल्या देशातला करिश्मा असलेले नेतृत्व पाहीजे असतेच.. 77 मध्ये जनता पक्ष कुठे होता का? शोधावा लागत होता.प्रत्येकाचा एक काळ असतो. आपण वयाच्या 25 पासून 75 पर्यंत चांगले काम करू शकतो..

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here