अक्कलकुवा / नंदुरबार : १४/३/२३
महाराष्ट्राची लालपरी म्हणजे ग्रामीण भागातल्या जनतेला जोडणारा एसटीचा दुवा..
स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेक गावांना दळणवळणाच्या सुविधा नाही..
होराफळी येथे ये जा करण्यासाठी रस्ता आहे मात्र जाण्यासाठी बस नव्हती त्यामुळे खापर आणि तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागायची अवैध वाहतुकीचा आधार घ्यावा लागायचा..
मात्र आमदार आमच्या पाडवी यांच्या पाठपुराव्यातून अखेर अक्कलकुवा होराफळी एसटी सेवा सुरू झाली.. आणि ग्रामस्थांच्या जीव भांड्यात पडला..
कारण आता त्यांची पायपीट वाचणार त्यांचा जीवघेणा प्रवास देखील वाचणार..
ग्रामस्थांची अनेक महिन्यांपासून आगाराकडे विनंती होती मागणी होती मात्र ती पूर्ण केली जात नव्हती
मात्र आमदारांच्या पाठपुराव्यानंतर अक्कलकुवा आगारात रुजू झालेले आगार व्यवस्थापक संजय कुलकर्णी यांनी तातडीने बस सेवा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली..
या बस सभेचा शुभारंभ श्रीफळ वाढवून आमदारांनी केला..
यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक समाज कल्याण सभापती शंकर पाडवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख विद्यासाळी, आगार प्रमुख संजय कुलकर्णी यांच्यासह शहर प्रमुख राजेंद्रसिंह चंदेल तालुका उपप्रमुख तुकाराम बळवी माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अमर वसावे दीपक पाडवी उपस्थित होते..
प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसत होती..
जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने आता प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला..
अखेर त्यांच्या सेवेत अक्कलकुवा होराफळी बस दाखल झाली..
सर्वत्र ग्रामीण भागातून या सेवेबद्दल आनंद व्यक्त होतोय तर एसटी आगाराचे आभार मानण्यात आले..
शुभम भंसाली,अक्कलकुवा प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही न्यूज..