Allu Arjun Arrested : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन यांना हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या प्रीमिअरच्यावेळी झालेल्या या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता.
Allu Arjun यांनी या प्रकरणात FIR रद्द करण्याची मागणी करत तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
घटनाकाळ:
4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘Pushpa 2 ‘ या चित्रपटाचा प्रीमिअर होता. अल्लू अर्जुनची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांचा 8 वर्षांचा मुलगा जखमी झाला होता.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिस कारवाई:
पोलिसांनी या प्रकरणी अल्लू अर्जुन, त्यांची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी थिएटर मालक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि खालच्या बाल्कनीचे प्रभारी यांना आधीच अटक करण्यात आली होती.
मृत महिलेचे कुटुंबीय अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती.
या घटनेमुळे साऊथ सिनेमा जगतात खळबळ उडाली आहे.