अमरावती -१८/५/२३
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला.
परिणामी शिंदे गट आणि भाजपाच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. निकालानंतर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना तसे सुतोवाच केले होते. आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नसली पाहिजे.
तातडीने मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
मात्र, त्यानंतरही काहीच हालचाल दिसत नसल्याने बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्तारावरुन सरकारला घराचा आहेर दिला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
कारण एका मंत्र्याकडे आठ ते नऊ जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्ह्याला व जनतेला न्याय मिळू शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो व विस्तार करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देखील विस्तार करण्यासाठी अनुकूल आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
त्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टीने विस्तार करावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
यावर आता शिंदे-फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे मला दिलेला शब्द पाळतील : बच्चू कडू
मंत्रिमंडळात माझी वर्णी कधी लागणार, हे सांगता येत नाही.
पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द पाळतील, हे निश्चित आहे. माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्या आहेत, त्यावरुन 21 ते 22 मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार हा आमच्यासाठी नव्हे तर जनतेसाठी महत्त्वाचा आहे.
सध्या एका मंत्र्याकडे पाच-सहा खाती आहेत. त्यामुळे कारभार सांभाळताना अडचणी येतात.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा गरजेचा आहे. आता कोणालाही मंत्री करा, पण मंत्रिमंडळ विस्तार होणे महत्त्वाचे आहे.
आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर तो 2024 नंतरच होईल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
कोणाला मिळणार संधी?
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मोजक्याच आमदारांना संधी मिळाली होती.
मंत्रिपद हुकलेले आमदार त्यामुळे नाराज होते. बराच काळापासून हे नाराजी आमदार मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक आमदारांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे.
या मंत्रीमंडळ विस्तारात साधारण 15 ते 19 मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी चर्चा आहे.
राज्य सरकारच्या सध्याच्या मंत्रीमंडळात एकूण 20 मंत्री आहेत. यात आणखी 15 ते 19 मंत्र्यांची भर घालण्यात येणार असून, त्यानंतर नव्याने खातेवाटप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नव्या मंत्र्यांची भर पडल्यानंतर पालकमंत्र्यांच्या यादीतही बरेच बदल केला जाऊ शकतो.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,अमरावती