लासूर,चोपडा/जळगाव :१५/०२/२०२३
- शॉर्ट
- 1 नाटेश्वर महादेव मंदिर लासुर ते मुक्ताबाई निघाली पायी दिंडी
- 2 अनिल बापू मित्र परिवाराकडून भाविकांना केलं बिस्किटे व मिनरल बॉटलच वाटप
- 3 पायी दिंडी सोहळ्याला आहे 13 वर्षांची परंपरा कायम
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण गावाजवळ तापी व पूर्णा नदीच्या संगमावर वसलेलं मुक्ताबाई यांचे पवित्र स्थळ.. यानिमित्त लासुर ते मुक्ताबाई अशी निघते पायी दिंडी..
मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही दिंडी काढण्यात येते. हरिभक्त पारायण बापू महाराज, विश्वास महाराज, प्रकाश महाराज यांच्या संकल्पनेतून ही दिंडी काढतात. सुमारे 13 वर्षांची परंपरा कायम राखत या दिंडीला महत्त्व आहे. लासुर हिंगोना, बोरखेडा किनगाव या ठिकाणाहून भाविक दिंडीत सहभागी होत असतात. लासुर येथील माजी पंचायत समिती सदस्य अनिल बापू मित्र परिवाराकडून भाविकांना बिस्किटे व मिनरल पाण्याची बॉटल वाटप करण्यात आलं.
ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात येतं. राहुल पाटील पत्रकार आत्माराम पाटील यांच्या हस्ते देखील हे वाटप करण्यात आलं. या दिंडी मागील भावना हरिभक्त परायण बापू महाराज यांनी व्यक्त केली.. ऐकूया बापू महाराज नेमकं काय म्हटलेत…
याप्रसंगी दिंडी प्रमुख हरिभक्त पारायण बापू महाराज यांच्यासह विश्वास महाराज, रोहन महाराज, अविनाश महाराज, कीर्तनकार कृष्ण महाराज, दिव्या चौधरी व विविध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आत्माराम पाटील चोपडा प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज..