पायी दिंडीतील भाविकांची भागवली अनिल बापू मित्र मंडळाने तहान…

0
383

लासूर,चोपडा/जळगाव :१५/०२/२०२३

  • शॉर्ट
  • 1 नाटेश्वर महादेव मंदिर लासुर ते मुक्ताबाई निघाली पायी दिंडी
  • 2 अनिल बापू मित्र परिवाराकडून भाविकांना केलं बिस्किटे व मिनरल बॉटलच वाटप
  • 3 पायी दिंडी सोहळ्याला आहे 13 वर्षांची परंपरा कायम

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण गावाजवळ तापी व पूर्णा नदीच्या संगमावर वसलेलं मुक्ताबाई यांचे पवित्र स्थळ.. यानिमित्त लासुर ते मुक्ताबाई अशी निघते पायी दिंडी..

ADVERTISEMENT

मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही दिंडी काढण्यात येते. हरिभक्त पारायण बापू महाराज, विश्वास महाराज, प्रकाश महाराज यांच्या संकल्पनेतून ही दिंडी काढतात. सुमारे 13 वर्षांची परंपरा कायम राखत या दिंडीला महत्त्व आहे. लासुर हिंगोना, बोरखेडा किनगाव या ठिकाणाहून भाविक दिंडीत सहभागी होत असतात. लासुर येथील माजी पंचायत समिती सदस्य अनिल बापू मित्र परिवाराकडून भाविकांना बिस्किटे व मिनरल पाण्याची बॉटल वाटप करण्यात आलं.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात येतं. राहुल पाटील पत्रकार आत्माराम पाटील यांच्या हस्ते देखील हे वाटप करण्यात आलं. या दिंडी मागील भावना हरिभक्त परायण बापू महाराज यांनी व्यक्त केली.. ऐकूया बापू महाराज नेमकं काय म्हटलेत…

हरि भक्त पारायण बापू महाराज यांनी दिंडीविषयी माहिती देतांना..

याप्रसंगी दिंडी प्रमुख हरिभक्त पारायण बापू महाराज यांच्यासह विश्वास महाराज, रोहन महाराज, अविनाश महाराज, कीर्तनकार कृष्ण महाराज, दिव्या चौधरी व विविध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आत्माराम पाटील चोपडा प्रतिनिधी एम डी टीव्ही न्यूज..

atmaram patil chopda
RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here