नेर : १३/३/२०२३
साक्री येथील दिनांक 12 मार्च रोजी श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील कला व भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय साक्री येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौ मंजुळा गावित लाभले होते
तर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव मंगला देसले, माजी सरपंच श्री पंकज भामरे, नगरसेवक श्री सुमित नागरे लाभले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि प्राचार्य पी एस सोनवणे होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनापर मनोगतात आमदार सौ मंजुळा गावित यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी औपचारिक शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षणातही सक्रिय सहभाग नोंदवायला पाहिजे.
आज विशेषतः मुलींसाठी समाजात छान असे व्यासपीठ निर्माण झाले आहे . विशेषतः पालकांकडून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुलींना आग्रह केला जातो
म्हणून या संधीचे सोने करावे ..
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ पी एस सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षही मनोगतात अलीकडे उत्तम कलाकार जे पाहायला मिळू लागले ते महाविद्यालयातील अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून उदयास आले आहेत.
म्हणून ज्यांच्याकडे विविध प्रकारची कला आहे व्यासपीठावर विकसित करत नावलौकिक करण्याची जी संधी मिळते तिचा लाभ घ्यावा असे आव्हान केले.
महाविद्यालयातील 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, एकांकिका, विडंबनात्मक नाट्य, गायन, मिमिक्री इत्यादी विविध कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.
या यशस्वी कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ विजय देसले यांनी केलं.
दिलीप साळुंखे ,धुळे तालुका प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज ..