.. शिवपिंडीवर कृत्रिम बर्फ..

0
153

महाराष्ट्र हा पुरोगामी आणि संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्र मानला जातो. त्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवणारे काही कमी नाहीत.. असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे तो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून..

त्र्यंबकेश्वरच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 रोजी समाज माध्यमात प्रसारित झाला होता.. याबाबत पोलीस तपासात एका पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचे आढळून आलं.. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका पुजाऱ्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल केले.. नेमका हा व्हिडिओ आहे तरी काय ते पाहूया..

शिवपिंडीवर कृत्रिम बर्फ..

सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. समितीच्या अहवालानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पिशवीत बर्फ नेऊन पिंडीवर ठेवल्याचं व त्यावर बेलपत्र ठेवून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याचं निष्पन्न झालं.

त्या मंदिरातील पुजारी सुशांत तुंगार आणि त्याला मदत करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर भारतीय दंड विधान 505 तीन, 417 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक शाखेने देखील चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांच्या केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं.. याबाबत अधिक माहिती देतायेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, ऐकूया चांदगुडे सर काय म्हणालेत..

कृष्णा चांदगुडे,राज्य कार्यवाह ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,नाशिक

अशाप्रकारे अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे पुजारी आणि यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई भविष्यात होईल हीच अपेक्षा.. आम्ही देखील श्रद्धेचा आदर करतो मात्र जेव्हा श्रद्धेचा अतिरेक होऊन अंधश्रद्धेपोटी समाजाचा शोषण होतं तिथं आम्ही नक्कीच आक्षेप घेणार आणि या बातमीचा पाठपुरावा सतत करत राहणार, समाजाची विवेक बुद्धी निश्चितपणे वाढीस लागेल हीच अपेक्षा..

नाशिकहून तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी एमडीटीव्ही न्यूज नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here