Nandurbar News Today : मेंढपाळांवर हल्ला, चार मेंढ्या मारल्या, दोन महिलांसह पाच जण जखमी…!

0
106
Attack on shepherds Nandurbar News Today four sheep killed

शिंदखेडा – ( Nandurbar News Today ) काल झालेल्या अत्यंत मेंढपाळ हयांना वाईट अनुभव आला. जे शेतकरी साठी जमिनीवर आपल्या मेंढी चारत जमिन थोड्या प्रमाणे दिवस रात्री ची जिवाची पर्वा न करता मेहनत करता आपला संघर्ष करण्याची ताकद घेऊन जिवाची बाजी लावणारे मेंढपाळ कष्टमय संघर्ष करतात .

असीच घटना काल शिंदखेडा विरदेल शिवारात झाली. घटना अशी घडली,शिंदखेडा शहरानजीक विरदेल रोड कैलास मराठे यांच्या शेतात मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या वर काल दूर्दीवी प्रसंग आला तो म्हणजे रस्ता क्रास करताना टाटा ट्रक क्र.एम.एच.46 आर 0729 या वाहन चालकाने हयगयिने ठोस मारुन चार मेंढया जागेवर गतप्राण केल्या.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाहन जागेवर थांबवुन चालकाने  तडजोडी अंती वीस हजार रूपये भरपाई देवु असे मान्य करत काही काळ लोटला तोच सुलवाडे गावातील दहा ते पंधरा  इसमांनी छोटा हत्ती ,मोटारसायकल, ट्रक्टर ने त्यांच्या गस्तीवर हल्ला चढवला तेथेही त्यांनी तिन चार मेंढी कोयटा व इतर हत्यार ने मारुन मेंढपाळ दोन,दोन महिला सह जबर मारहाण केली.

शिंदखेडा पोलीस स्टेशन ला हया विषयावर मेंढपाळ यांनी तक्रार दिलीआहे .ह्यामध्ये प्रवीण चैत्राम वाघमोडे, शिवा सुभाष व्हटगर, सरलाबाई व्हटगर , विमलबाई वाघमोडे यास जबर जखमी केले असुन त्यांना धुळे येथे शासकीय रुग्णालय येथे दाखल केले आहे. हयासाठी नाना पडळकर, राहुर वाघमोडे, भिवा वाघमोडे, सुभाष सटक, सुरेश सटक, नारायण पडळकर, पिंटू सोनु, विनोद धनगर, रविंद्र गोरख, पांडुरंग कोळी यांनी आरोप केला आहे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला तक्रार केली आहे. सदर प्रकरणात चौकशी करण्यात यावी अशी मेंढपाळ यांनी मागणी केली आहे.

आमच्या वर दिवसा रात्री असे प्रकार होत असतील तर आम्ही जिवन कसे जगायचे. आमच्या अर्धांगिनी ना सुरक्षा नसेल तर आम्ही काय करू अन्यथा मोठा उद्रेक होणार अशी मेंढपाळ संघटनेने केली आहे. रात्री उशिरा शिंदखेडा पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आली आहे.सुलवाडे येथील दहा ते पंधरा इसमांवर भादंवि कलम  354,324,143,147,148,149, 279, 429, 504 अन्वये नोंद केली आहे.

प्रतिनिधी – यादवराव सावंत शिंदखेडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here