केळी, पपई उत्पादन परिषदेत हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती…

0
118

नंदुरबार : २३/३/२३

नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे पपई केळी फळ बागायतदार सहकारी संस्थेतर्फे शेतकरी परिषद संपन्न झाली

त्या परिषदेला महाराष्ट्र आणि गुजरात मधील हजारो केळी आणि पपई उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा केळी आणि पपई परिषदेचे आयोजक अभिजीत मोतीलाल पाटील यांनी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणि संघटनात्मक कामे सुरू केली आहे

त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक प्रमोद पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य आणि चांगला भाव मिळावा या एकमेव दृष्टीने संघटनेचे काम असून त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही

बाहेरील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर शेतकऱ्याला संघटनेतर्फे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे.

जी. आय. नामांकन मिळवून देण्यासाठी आणि कोल्डस्टोरीज साठी प्रयत्न सुरू आहेत

वर्षभरात शेतकऱ्यांनी पिकाचे नियोजन करावे शेतकऱ्याने भावनिक न होता व्यावहारिक झाला पाहिजे

बँकेमधील आपला स्वतःच्या सिविल स्कोर कसा वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे असे या वेळेस सांगण्यात आले.

जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here