ऊसतोड मजुरावर संकट…संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य जळून खाक..

नंदुरबार : २३/३/२३

धडगाव तालुक्यातील त्रिशूल गावातील भुगदेवपाडा येथील ऊसतोड कामगाराच्या घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या ऊसतोड कामगाराचे घर पूर्णतः जळून खाक झाले .. जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे

ADVERTISEMENT

संसार उपयोगी आणि घरातील धान्याचे नुकसान झाले आहे.

लाखोंचे नुकसान या घटनेत झाले असल्याचे बोलले जात आहे.

SPONSORED CONTENT

नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या ऊसतोड कामगाराच्या घराला अचानक आग लागल्याने नुकसान झाले आहे. बामण्या लाखा वसावे असे या ऊसतोड कामगाराचे नाव असून नंदुरबार च्या धडगाव तालुक्यातील त्रिशूल गावातील भुगदेवपाडा येथील रहिवासी आहे.

बामण्या लाखा वसावे यांच्या घराला भर दुपारी आग लागून जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बामण्या लाखा वसावे यांचे संपूर्ण कुटुंब पंढरपूर येथे ऊस तोडीच्या कामासाठी स्थलांतर झालेले आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

परंतु प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार अचानक दुपारी घरातून धुराचे लोट निघताना.

आजूबाजूच्या नागरिकांना दिसून आल्यानंतर.

जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल

त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

परंतु बामण्या लाखा वसावे यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले.

आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

बामण्या लाखा वसावे यांचे संपूर्ण कुटुंब ऊसतोड कामानिमित्त गेलेले असून या गरीब परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून राख झाला आहे.

महसूल विभागाच्या वतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच वाहरीबाई सुरजसिंग पाडवी व गावकऱ्यांनी केली आहे.

जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here