शिंदखेडा – आगामी सण उत्सव तसेच महात्मा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात पार पाडा तसेच डीजेचा वापर टाळुन दिलेल्या वेळेवर मिरवणूक संपवावी, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन नागरिकांचे प्रबोधन करणे, असे प्रतिपादन शिंदखेडा येथील शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी केले.
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा पोलीस स्टेशनला शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरपंचायतचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, प्रकाश चौधरी, सेवानिवृत्त प्राचार्य प्रदीप दिक्षित, प्रा.अजय बोरदे, डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष संजय पाटोळे, प्रा.निरंजन वेंदे, डॉ. इंद्रीस कुरेशी आदीं मान्यवर उपस्थित होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड होते. गोपनीय विभागाचे रमेश माळी यांनी पोलीस पाटलांना आगामी काळात येणारे सण उत्सव जयंती या पारशभुमीवर आपल्या गावातील मिरवणुकीबाबत समिती स्थापन करणे व पोलीस स्टेशनमध्ये मिरवणुकीबाबत परवानगी काढणे तसेच मिरवणुकीची वेळ याबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, तसेच सामाजिक, जातीय सलोखा राखून एकोप्याने सण-उत्सव साजरा करा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी केले.
शिंदखेडा शहरातील सुनील चौधरी, प्रकाश चौधरी, प्रा. प्रदीप दिक्षित, डॉ. इंद्रीस कुरेशी, प्रवीण माळी, संजय पाटोळे, प्रा. निरंजन वेंदे, शशीकांत बैसाणे , चंद्रकांत गोधवाणी, गुलाब सोनवणे यासह पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, कार्याध्यक्ष डॉ महेंद्र पाटील, कार्याध्यक्ष संजय खैरनार, मनोहर पाटील, चरणसिंग गिरासे, भडणे येथील आदर्श पोलीस युवराज माळी, भैय्या नगराळे प्रदीप गिरासे , महिला तालुकाध्यक्षा अनिता पाटील, अर्चना पाटील, मानसी पाटील, स्वाती ढिवरे तसेच शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सर्व गावातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन हेकाॅ. रमेश माळी यांनी केले तर आभार पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार यांनी मानले.
यादवराव सावंत, एम.डी.टी.व्ही.न्यूज शिंदखेडा