आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे माहीती व प्रशिक्षण कार्यशाळा
नंदुरबार :- जिल्ह्यात मागील काही वर्षापासुन मार्च ते मे कालावधीत ४० अंश सेल्सीयस पेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विषेशत: मे च्या दुसऱ्या पंधरवाड्यात मोठ्या प्रमाणावर तापमाणात वाढ होते. त्यामुळे कालावधीत जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई यांच्याव्दारे तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उष्णतेची लाट कृती आराखडा २०२२-२३’ नुसार नंदुरबार जिल्ह्याचा अतितीव्र उष्मलाट प्रवण जिल्हांमध्ये समावेश होतो आहे.
उष्णतेची लाटेचा व उष्माघात होण्याचा धोका पहाता जिल्ह्यात आपत्ती पूर्व तयारी, क्षमता वर्धन व प्रशिक्षण, DRR (Disaster risk reduction) आपत्तीचा धोका कमी करण्याच्यासाठी, उष्णतेच्या लाटेच्या परिणामाचा प्रभाव/ तीव्रता कमी करण्यासाठी उष्णतेची लाट व उष्माघात कारणे, परिणाम व उपाय याबाबात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी नागरीकांमध्ये शाळा, महाविद्यायलातील विद्यार्थ्यामध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), जिल्हा नंदुरबार यांच्याव्दारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नंदुरबार येथे महाविद्यायलयाच्या समन्वयाने “उष्णतेची लाट व उष्माघात (कारणे, परिणाम व उपाय)” या विषयावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या कार्यशाळेत उष्णतेची लाट त्यांची कारणे, परिणाम व उपाय या विषयावर श्री सुनिल शंकर गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सल्लागार – NDMA प्रकल्प यांनी सहभागी सर्व विद्यार्थी यांना मार्गदर्शन / माहीती दिली. वाढत्या तापमानवाढीमुळे मानवीशरीर, वन्यप्राणी, पशुपक्षी, शेती तसेच पर्यावरणावर होणारे परिणामांवर लक्ष वेधण्यात आले. अती उष्णतेमुळे मनुष्य व प्राणी यांना उष्माघाताचा त्रास होत आहे. याच्या बचावासाठी काय करावे, काय करू नये या उपाय योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहीती देण्यात आली.
उष्माघातापासुन बचावासाठी दुपारी १२.०० ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे/ परिधान करणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शाररीक श्रमाची कामे टाळावीत, तसेच उन्हात बाहेर खेळायला जाऊ नये, शिळे अन्न खाऊ नये, मद्य सेवन, चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक घेवू नये, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच दुपारच्या वेळेत बाहेर पडावे लागले तर सोबत पाणी सोबत ठेवावे व सुती कपडे परीधान करावे तोंडाला व मानेला रुमाल किंवा कपड्याने झाकावे यामुळे आपण उष्माघाता पासुन आपले रक्षण करू शकतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस. घ्यावे, लस्सी / ताक / कैरीचे पन्हे / लिंबू पाणी नियमित सेवन करावे, गुरांना / पाळीव प्राण्यांना सावलीमध्ये ठेवण्यात यावे. घरातील गरोदर महीला, लहान मुले, वृध्द, आजारी व्यक्ती अधिक काळजी घेण्यात यावी, घराच्या छतावर- झाडांजवळ पशुपक्षांसाठी पाणी ठेवावे. तसेच उष्माघातापासुन स्वत:ची व कुंटुंबातील सदस्य यांची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील, निदेषक/ शिक्षक जितेंद्र वाघ, शुभम मराठे, शुभम साळुंखे, एल.टी.गांगुर्डे उपस्थित होते. तसेच कार्यशाळा यशस्वीरित्या पुर्ण होण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व शिक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.