शिरपूर : ८/३/२०२३
होळीचा सण हा संपूर्ण भारतवर्षात सप्तरंगांची उधळण करणारा म्हणून ओळखला जातो.
तसेच संपूर्ण भारतभरातील बंजारा बांधव होळी सण आपल्या पंरपरागत पद्धतीने साजरा करतात.
त्याचप्रमाणे शिरपूर तालुक्यातील बंजारा समाज बभळाज या गावी होळी सण मोठया उत्साहाने साजरा करतात.
सर्व ग्रामजण या उत्सवात सामील झालेले असतात.
होळी सण बंजारा समाजासाठी महत्वाचा सण आहे.
होळीमध्ये लेंगी गीत गायल्या जाते.
लेगी गीतांमध्ये होळीचे वर्णन केलेले असते.
या लेंगी गीतांवर स्त्री-पुरुष गोलाकार वर्तुळात नाचत असतात.
लहान मुलांपासून तर वृध्दमाणसांबरोबर या उत्सवात लेंगी गीत गात-गात नृत्यही सादर करतात.
महिनाभर हा उत्सव गावातील तांडयावर चाललेला असतो. प्रत्येक तांडयावर होळीचे रंग उधळले जातात. इतर समाजामध्ये होळी ही आधल्या दिवषी सायंकाळी पेटते परंतू बंजारा समाजामध्ये दुसर्या दिवशी सकाळी धुलीवदनाच्या दिवशी होळी पेटवली जाते.
गावकऱ्यांच्या सामुहिक उत्सवामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दर्शन घडते.
समाजाची प्रगती साधण्यासाठी व बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहीत राहण्यासाठी होळी हा उत्सव, बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे, असे म्हणता येईल.
होळीच्या आधी येणाऱ्या दांडी पौर्णिमेपासून या होळी उत्सवाला सुरुवात होते.
याची लगबग होते ती बंजारा लोकगीतांनी. या गीतांना ‘लेंगीगीत’ असंही म्हटलं जातं.
होळीतील लेंगीगीतांच्या ठेक्यावर आबालवृद्ध अक्षरश: स्वत:चं वय विसरत बेभानपणे नाचतात.
ज्यांचे लग्न या वर्षात करायचे आहे अशी उपवर मुले होळीसाठी लाकडं जमा करतात…
या उपवर मुलांना ‘गेरीया’ असं म्हटलं जातं.
मौखिक असणाऱ्या लेंगी गीतांमध्ये बंजारा समाजाचा संघर्ष सांगणारी, शिक्षण, व्यसनमुक्तीचं महत्व सांगणारी गीतं असतात. सोबतच एखाद्याची खेचणारी वात्रटिकाही यात असते…
बंजारा समाजाच्या होळीत ‘पाल’, ‘गेर’, ‘फाग’, ‘धुंड’ अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात…
होळीच्या दुसऱ्या दिवशीही रंगपंचमीच्या दिवशी बंजारा तांडा आनंदात हरवून गेलेला असतो. समाजातील महिला यादिवशी बंजारा लोकगीतं गात ‘फाग’ म्हणजे ‘फगवा’ मागतात.
‘फगवा’ किंवा ‘फाग’ म्हणजे होळीचा आनंद साजरा करण्यासाठी समाजातील व्यक्तीकडून आनंदाने आणि हट्टाने घेतलेले पैसे.
होळी इतरत्र महिलांना फारसं स्थान नसतं, पण बंजारा समाजातल्या होळीतलं महिलांचं विशेष स्थान निश्चितच सुखावून जाणारं आहे.
राज जाधव शिरपूर ग्रामीण प्रतिनिधी [ बभळाज ] एम डी टी व्ही न्यूज