शिरपूर – तालुक्यातील सांगवी येथे अखिल भारतीय किसान सभेचा ८८ व्या वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यार आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी बाजारपेठ ते बस स्थानक मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
सांगवी (ता. शिरपूर. जि. धुळे ) येथील किसान सभेचे विभागीय कार्यालयातील प्रांगणात किसान सभेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी किसान सभेचे जेष्ठ नेते अर्जुन कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात करण्यात आली. अँड. हिरालाल परदेशी, ओंकार जाधव, हेमराज राजपुत, सतिलाल पावरा, डाॅ. किशोर सुर्यवंशी, रामचंद्र पावरा, डाॅ.सरोज पाटील, नाना पाटील, वसंत पाटील, अर्जुन कोळी आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबा शिंपी यानी केले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या प्रसंगी मोहन नाना, अँड. गोपाल राजपुत, हेमराज राजपुत, संदिप पाटील, मनोहर बापू आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काॅ. शिलदार पावरा, गुमान पावरा, योगेश पावरा, हरचंद पावरा, तुळशीराम पाटील, कैलास पाटील, लकड्या पावरा व भरत सोनार आदींनी परिश्रम घेतले.
राज जाधव, एम.डी. टी.व्ही न्युज शिरपूर ग्रामीण