येवला /नाशिक -१२/६/२३
येवला शहरात साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्प व मुक्ती भूमी परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी सुरू असलेले कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी मुक्ती भूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, उपविभागीय अभियंता अभिजीत शेलार सहायक कार्यकारी अभियंता सागर चौधरी, मुक्ती भूमीच्या संचालिका पल्लवी पगारे, येवला शहर पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, सुभाष गांगुर्डे, भाऊसाहेब धनवटे, मलिक मेंबर, पिंटू मांजरे, सुमित थोरात यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा ..
बापरे… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तुटलं मुलीचं लग्न… वर पित्याने दिले हे कारण ! – MDTV NEWS
मुक्ती भूमी येथे भिक्कु निवास, भिक्कू पाठशाळा, ऑडिओ व्हिज्युअल रूम, ॲम्पी थिएटर, विपश्यना हॉल, पाली भाषा संशोधन केंद्र, ग्रंथालय, प्रशासकीय कार्यालय, व्यापारी संकुल, कर्मचारी निवासस्थान, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, बागबगीचा, पार्किंग सुविधा यासह विविध विकास कामांचा समावेश आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
येवला शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा,शिवकालीन ऐतिहासिक घटनांचे म्यूरलस्, गार्डन, माहिती केंद्र, उपहारगृह, स्वच्छ्ता गृह इत्यादी कामांचा समावेश आहे.
तेजस पुराणिक ,एम डी टी व्ही न्यूज ,जिल्हा प्रतिनिधी,नाशिक