बिग ब्रेकिंग :बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये चूक..

0
557

मुंबई :२१/२/२३

बारावीच्या पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये (HSC Board Exams) मोठी चूक झाली आहे.  

बारावी बोर्डाच्या इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे नेमकं करायचं काय असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला.

12th exam
बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक; प्रश्न ऐवजी उत्तर आले छापून

बारावीच्या  परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या या परिक्षेच्या पहिल्याच  दिवशी मोठा घोळ पहायला मिळाला (HSC Board Exams).  बारावीच्या पेपरमध्ये मोठी चूक झाली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले ( Error in English Subject Question Paper). प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

  पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा पेपर होता. बारावीच्या इंग्रजी पेपर मध्ये प्रश्न ऐवजी  उत्तर छापून आले. यामुळे शिक्षण मंडळाची चूक उघड झाली आहे. 

आजच्या बारावी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापले आहे. आता या प्रश्नाचे मार्क मिळणार का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. तर,  शिक्षण मंडळ या चुकीबाबातक काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम आहे.

परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्याच इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुक आढळली.

परिणामी राज्य मंडळाला प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीबद्दल विद्यार्थ्यांना सहा गुण द्यावे लागणार आहेत.

राज्य मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रश्नपत्रिकेच्या छपाईत झालेल्या चुकीचा लाभ मात्र विद्यार्थ्यांना होणार आहे.

याबाबत राज्य मंडळास विचारणा केली असता, प्रश्नपत्रिकेच्या छपाईत चुक झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. दरम्यान, याशिवाय बारावीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत आणखी एक चूक झाल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिकेत तीन क्रमांकात चूक झाल्याचे इंग्रजीच्या शिक्षकांचे म्हणणे आहे.

‘प्रथमदर्शनी प्रश्नपत्रिकेत छपाईची चुक झाली असल्याचे दिसून येत आहे. प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्न छापण्यात आलेले नाहीत, तर एका प्रश्नांऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे. याबाबत परीक्षेचे नियामक, मुख्य नियंत्रकांचा अहवाल घेण्यात येईल. त्यात चूक निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत.’

– शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here