अंदाज चुकताय ; पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई नाकारण्याचे आवाहन
हवामान विभागामार्फत मान्सून बाबत वर्तवण्यात आलेले अंदाज चुकत असल्याने यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळामुळे मान्सूनची आगेकूच थांबली आहे. मान्सून ४ जुनपर्यत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र अजूनही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. १० जुन पर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार होता मात्र तसे न झाल्याने हे दोन्ही अंदाज चुकल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा:
मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS
साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – MDTV NEWS
मान्सूनने अरबी समुद्राचा काही भागासह दक्षीण श्रीलंका व बंगालचा काही भागापर्यत प्रगती केल्याची माहिती हवामान खात्याने दिल्याने लवकरच केरळ सह महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाबाबत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र अरबी समुद्रातील संभाव्य चक्रीवादळामुळे मान्सुनची वाटचाल थांबली असुन त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीसाठी अजुन वाट पहावी लागणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मान्सून साठी अजुन १० दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. केरळमध्ये पुढील चार दिवसांनंतर मान्सुनसाठी पोषक स्थिती तयार होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यानुसार राज्यात १५ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. १६ ते २२ तारखेदरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल अशी माहिती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हे सुध्दा वाचा:
मंदिरात क्रिती सेननचा किस… व्हिडिओ व्हायरल – MDTV NEWS
साक्षी हत्याकांडतील आरोपींवर तात्काळ कारवाई करा – MDTV NEWS
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी चांगला योग्य पावसाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. घाई केल्यास व पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. तरी शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पेरणीचे नियोजन करावे, असे देखील आवाहन करण्यात येत आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, मुंबई.