नांदेड -१२/४/२३
नांदेड मध्ये हिंसक आंदोलन करुन सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या खटल्यात न्यायलयाने शिवसेनेच्या माजी आमदारासह 19 जणांना पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी एक लाख साठ हजार रुपये दंड सुनावला आहे.
2008 साली शिवसेनेने नांदेड मध्ये महागाई विरोधात आंदोलन केले होते, तेव्हाच्या सेनेच्या आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.
शहरातील हिंगोली गेट भागात हे आंदोलन सुरू असताना अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यानी एसटी बसेसवर दगडफेक केली, यात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चार बसेस, आंध्र प्रदेशच्या चार बसेस आणि महापालिकेच्या एका बसचे नुकसान झाले होते. दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
या खटल्याची सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात झाली. यात एकरा साक्षीदार तपासण्यात आले.
दोन जखमी पोलीसांची साक्ष महत्वाची ठरली. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने माजी आमदार अनुसया खेडकर त्यांचे पूत्र महेश खेडकर , सेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह सेना भाजपाच्या 19 जणांना पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी एक लाख साठ हजार दंड अशी शिक्षा न्यायलयाने ठोठावली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिककरा आणि https://bit.ly/3UoK7E0जॉईनकरा.
शासकिय कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे , सार्वजानिक मालमत्तेचे नुकसान करणे अशा वेगवेगळ्या कलमाखाली ही शिक्षा सुनावण्यात आली.
विशेष म्हणजे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी सर्वाधिक पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
सर्व आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे . जिल्हा सत्र न्यायाधीश एस ई बंगार यांनी हा निकाल दिला.सरकारी पक्षाची बाजू एड अनुराधा कोकाटे यांनी मांडली.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो नांदेड