.. दहावी-बारावी परीक्षासंदर्भात मोठी अपडेट.. परीक्षा स्थगित होणार?

0
491

मुंबई:दि.११/०२२०२३

शैक्षणिक वर्तुळातून येते एक सर्वात मोठी अपडेट जी आहे इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत संदर्भातली..

येत्या 21 फेब्रुवारी 2023 पासून बारावीची परीक्षा सुरू होते पण त्याआधी एक मोठी अपडेट हाती आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते.

कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

”शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यामुळे प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी 13 फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहेत. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास परीक्षा काळात अनिश्चित काळासाठी संप करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाने राज्य सरकारला दिलाय.”

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबई विद्यापीठातल्या परीक्षा ही स्थगित करण्याची वेळ ओढावली आहे. तेव्हा दहावी बारावीच्या परीक्षांचा काय होणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. यामुळे शैक्षणिक वर्तुळात संभ्रमाचे वातावरण तयार झालंय.

नेमकं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत जाणून घेऊया?

*शिक्षकेतर कर्मचारी भरती त्वरित सुरू करा.

*कर्मचाऱ्यांना सेवा वर्ष योजनेचा सरकारना लाभ द्या.

*जुनी पेन्शन योजना लागू करा.

*अर्जित रजा साठवण्याची कमाल मर्यादा काढून टाकावी.

*अनुकंपा नियुक्तीवरील मान्यता तात्काळ देण्यात यावी.

एकूणच या बहिष्कारमुळे माध्यमिक शालांत आणि उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा आणि त्यावरील मुख्याध्यापकांचा ताण वाढण्याची आता शक्यता निर्माण होऊ घातली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकार किती गांभीर्याने या घटनेकडे बघते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आशा करूया की या सर्वांच्या मागण्या मान्य होतील आणि हा पुकारलेला संप कर्मचारी संघटना मागे घेऊन विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतील.

मुंबईहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here