BIRSA FIGHETRS:चौकशी करा अन गुन्हे दाखल करा .. केली मागणी

0
362

तळोदा /नंदुरबार -५/७/२३

आदिवासी सांस्कृतिक भवनात अनधिकृतपणे शिव मंदिर बांधकामाची चौकशी करून गुन्हे दाखल करावे यासाठी बिरसा फायटर्सने पोलीस स्टेशन तळोदा व पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की,मुळात:भवनाला ‘आदिवासी सांस्कृतिक भवन’नाव दिले आहे.आणि भवनातच शिव मंदिर बांधण्यात येत आहे हे फार मोठे षडयंत्र आहे.मुळात:आदिवासींची ओळख स्वतंत्र आहे.मात्र,काही वर्चस्ववादी समाजकंटकांकडून आदिवासी मूळ सांस्कृतिक ओळख नष्ट करण्यासाठी असे कटकारस्थान केले जात आहे.याबाबत आदिवासींमध्ये संतापाची लाट आहे.आदिवासी समाज हा सर्व देव-धर्मांचे सन्मान करतो.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

परंतु,आदिवासी सांस्कृतिक भवनात मंदिर कशासाठी?बांधायचे असेल तर विदयार्थ्यांसाठी एक भव्य वाचनालय बांधा.किंवा आदिवासींचे कुलदैवत अन्नदेवता ‘याहा मोगी’चे मंदिर बांधा.कोणाचा सांगण्यावरून हे अनधिकृत मंदिर बांधकाम सुरू आहे?आणि या अनधिकृत बांधकामाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का?असा प्रश्न उपस्थित केला आहे.पैसे गोळा करून अनधिकृत शिव मंदिर बांधणाऱ्या समाजकंटकांची सखोल चौकशी करून पालिका कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.अन्यथा,बिरसा फायटर्ससह आदिवासी संघटना व समाजबांधव बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :

GOOD NEWS:कोंडलेल्या स्मारक चौकाचा श्वास अखेर झाला मोकळा..

Ajit Pawar बनले राज्याचे नवे उपमुख्यमंत्री …

निवेदनावर बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय सुशीलकुमार पावरा,राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,विभागीय प्रवक्ता दयानंद चव्हाण,आदिवासी सांस्कृतिक समितीचे रणजित पाडवी, बिरसा फायटर्स जिल्हाध्यक्ष भरत पावरा,विभागीय कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, तालुका सचिव सुरेश मोरे,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा कार्याध्यक्ष किरण पाडवी,सहसंघटक कालूसिंग पावरा,सहसचिव सतीश पाडवी,जिल्हा सदस्य चुनिलाल पाडवी,गंगानगर शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी,रापापुर-पाल्हाबार सल्लागार गणेश पाडवी,चंद्रसिंग पाडवी, जगन मोरे, विलास वसावे आदी. कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

नितीन गरुड ,तळोदा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here