दिल्ली -६/४/२३
आज भाजपाचा स्थापना दिवस आहे. भाजपकडून देशभरात मोठ्या उत्साहात स्थापना दिवस साजरा करण्यात येत आहे.
देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
तसेच जनतेसाठी असलेल्या कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. जाणून घेऊयात मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे
आज भाजपाचा 43 वा स्थापना दिवस आहे, या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना भाजपसाठी राष्ट्र प्रथम असल्याचं म्हटलं आहे.
भाजपचं काम हनुमानासारखं आहे, हनुमानानं स्व:साठी कधीच काही केलं नाही तसंच भाजप देशासाठी काम करत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या वाढीचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं आहे. अनेकांच्या कष्टानं पक्ष वाढल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
नवा भारत आता कैकपटीनं सक्षम होतोय. भारत बजरंगबलीप्रमाणे बलशाली होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळते असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसची मानसिकता बादशाहाप्रमाणे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांनी परिवारवाद आणि वंशवादावरून देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली. परिवारवाद ही काँग्रेसची खरी ओळख असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
दरम्यान काँग्रेस नागरिकांमध्ये संभ्रम पसरवत असल्याचा आरोपीही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
भाजपामुळे भ्रष्टाचाराचा नायनाट झाला, असा दावाही यावेळी पंतप्रधानांनी केला आहे.
ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज, नवी दिल्ली ..