सारंगखेडा ,[ नंदुरबार ] : २८/२//२०२३
जनतेच्या विश्वासाला उतरणार लोकाभिमुख नेतृत्व कर्तुत्व म्हणजे सारंखेडाचे आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल..
त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला.
मोठ्या स्वरूपात सारंखेडात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं.
गोरगरीब आणि गरजू नागरिकांचा आरोग्य सुरक्षित राहो त्यांचा आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं.
पंचक्रोशीतील नागरिकांना याचा लाभ व्हावा या दृष्टीने आरोग्य शिबिर घेण्यात आलं. असे उद्गार जयपाल सिंग रावल यांनी काढले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच पृथ्वीराज रावल शांतीलाल पाटील सुरेश कुवर सिंधुबाई भिल संतोष मोरे हरीश भोई बोला मोरे आदी उपस्थित होते.
अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अविनाश पाटील त्वचारोग तज्ञ डॉक्टर शेख हृदयरोग तज्ञ डॉक्टर वसंत पाटील जनरल सर्जन डॉक्टर तपन भावसार आदी उपस्थित होते.
नंदुरबार येथील कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयामार्फत डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या संपूर्ण आरोग्य शिबिराचे आयोजन चेतक फेस्टिवल समितीने केलं होतं..
त्या समितीचे सदस्य रमेश पाटील, शरद शिरसाट ,राजू तावडे ,गणेश कुवर ,अशोक कुवर ,दीपक मोरे, सुनील चित्ते जाकीर खाटीक, अल्ताफ शाह आदींचा समावेश होता.
रावल गडीवर चाकण कडून दिवसभर रावलांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पत्नी जिल्हा परिषद सदस्य ऐश्वर्या रावल यांनी त्यांचं औक्षण केलं.
दिवसभर सोशल मीडियाच्या माध्यमातून दूरध्वनीवरून रावलांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
यावेळी सरपंच पृथ्वीराज सिंग राव ,रमेश पाटील, राहुल गिरासे आदी उपस्थित होते
गणेश कुवर सारंगखेडा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज नंदुरबार