मुंबई:१४/२/२०२३
सोशल मीडियावर लग्नसमारंभाशी संबंधित व्हिडिओज, फोटोज अनेकदा व्हायरल होत असतात. यापैकी बहुतांश व्हिडिओज मनोरंजक आणि हटके असतात. लग्नसमारंभ कसा आणि कोणत्या कारणामुळे हटके ठरला हे या व्हिडिओजमधून दाखवलं जातं. सध्या अशाच एका लग्नसमारंभाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नासाठी विवाहस्थळी जाण्याकरिता एका वराने आपल्या कुटुंबीयांसाठी चक्क पूर्ण विमान बुक केलं. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.
वधू असो अथवा वर, या दोघांसाठीही विवाहसोहळा संस्मरणीय असतो. लग्नाचा दिवस अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी बहुतांश जण आपला खिसा रिकामा करतात. विवाहसोहळ्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर खर्च केला जातो. लग्नाच्या काही दिवस आधीपासून घरात पाहुणे, मित्रमंडळींचं येणं-जाणं सुरू होतं.
त्यांच्या पाहुणचारासाठी मोठ्या संख्येनं वाहनं आधीच आरक्षित केली जातात. लांबच्या गावावरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही वेळा बस किंवा ट्रेनचं बुकिंग केलं जातं. ही सर्वसामान्य गोष्ट आहे; पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत असं दिसतं, की सर्व कुटुंबीयांना एकाच वेळी विवाहस्थळी नेण्यासाठी नवऱ्या मुलाने चक्क पूर्ण विमान बुक केलं आहे. या कुटुंबीयांच्या विमान प्रवासाचा हा व्हिडिओ आहे.
हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 39 हजारांहून अधिक जणांनी लाइक केला आहे. त्यावर युझर्सनी कमेंट्सदेखील केल्या आहेत. एका विमानातून सर्व नातेवाईक मोठी धमाल करत लग्नाला जाताना या व्हिडिओत दिसत आहेत. या सर्वांना अतिशय आनंद झाला असून, ते कॅमेराकडे हात दाखवताना दिसत आहेत. खरं तर याआधीही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले होते.
ज्यामध्ये संपूर्ण फ्लाइट बुक करून नातेवाईक आणि कुटुंबीय विवाहस्थळी दाखल झाल्याचं दाखवलं गेलं होतं. अशा कारणासाठी किती भाडं आकारायचं हे सर्वस्वी विमान कंपनीवर अवलंबून असतं.
दरम्यान, या व्हिडिओवर युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. `मी हे अनुभवण्यासाठी खूप उत्सुक आहे. यासाठी किती खर्च आला असेल? ही माणसं कुठून कुठे गेली हे कळलं तर खर्च किती आला असेल हेही समजेल,` असं एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं आहे. दुसरा एक युझर कमेंट करताना लिहितो, की `खरंच नशीबवान मुलगी आहे; पण प्रत्येकाच्या तिकीट बुकिंगसाठी किती पैसे खर्च झाले, हे कळलं असतं तर बरं झालं असतं.` त्यावर एक युझर उत्तर देताना लिहितो, की `हे बुकिंग कोणा एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण विमानाचं आहे.`
मुंबईहुन एम डी टी व्ही न्यूज ब्युरो