पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 17 महिलांना कारने उडवलं, 3 जणींचा मृत्यू

0
325

पुणे:१४/२/२०२३

पुणे नाशिक महामार्गावर खरापुडी फाटा इथं भीषण अपघात घडला आहे. पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिली आहे. या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळ असलेल्या शिरोली परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. पुणे बाजूकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्याचवेळी महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना ठोकर देऊंन वाहन चालक रस्ता दुभाजक तोडून वाहनासह फरार झाला. 

या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 7 महिला जखमी आहे. जखमी महिलावर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. फरार वाहन चालकाचा खेड पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पुणेहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो…

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here