राज्यातील १३१ आमदारांच्या विकासनिधीला ‘ब्रेक’ ?

0
129

मुंबई : ३१/३/२०२३

स्थानिक विकास कार्यक्रमासाठी देण्यात येणारा निधी तब्बल १३१ आमदारांनी खर्च न केल्याने आता त्यांच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या निधीला ब्रेक लावण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

सदर आमदारांनी २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षात आपल्या मतदारसंघात ८० टक्के पर्यंत कामांना प्रशासकीय मान्यता दिली नसल्याची तसेच मिळालेला निधीतून ५० टक्के निधी खर्च न केल्याची बाब समोर आल्याने त्यांना पुढील निधी मिळणार नाही.

30323
01

प्रत्येक आमदाराला स्थानिक विकास निधीतून चार कोटी रुपये विकास निधी दिला जातो.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu


स्थानिक विकास कार्यक्रमासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारने एक हजार ७३५ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

मात्र राज्यातील १३१ आमदार आपल्या चार कोटीपैकी किमान ५० टक्के निधी विकास कामांवर खर्च करू शकलेले नाहीत. त्यामुळे पुढील २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यांना मिळणाऱ्या निधीला ब्रेक लावण्यात आला आहे .

एम. डी. टी.व्ही. न्युज ब्यूरो, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here