तळोदा /नंदुरबार :23/6/23
BREAKING:नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात घरफोडी प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे.. यामुळे पोलिसांसमोर पुन्हा आता घरफोडी करणाऱ्या या चोरांना जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे


आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मिळालेल्या माहितीनुसार, शहादास रस्त्यावरील गोपाळ नगर मध्ये सोमावल येथील शिक्षक सुनील मगरे यांच्या घरी दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली.. त्यामुळे तळोदा शहरासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. शिक्षक सुनील मगरे आपल्या कुटुंबीयांसह गोपाळ नगर परिसरात राहतात.. ते शाळेत असताना गोपाळ नगर स्थित घरात घरपोडी करणाऱ्या चोरट्यांनी हात साफ केला.. 22 जून रोजी ही घटना दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडल्यानं पोलिसांसमोर आता एकच आव्हान आहे या गुन्हा करणाऱ्या आरोपींना जेरबंद करणे..
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… |
घराच्या मागील बाजूची किचनची खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.. बेडरूम मध्ये असलेले दोन कपाट फोडून चोरट्याने सर्वसामान अस्ताव्यस्त केलं.. कपाटातील सोन्याचे दागिने सहा तोळे गळ्यातील पोत, चार तोळ्यांचा छडा, मुलीच्या लग्नासाठी केलेली तजवीज म्हणून घेतलेले सहा तोळे सोने, चार ग्रॅम चे मणी, चांदीचे पंधरा तोळ्याचे दागिने सुमारे नऊ लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला… त्यामुळे मगरे कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय… मुलीच्या लग्नासाठी केलेली तजवीज देखील गेल्याने कुटुंबियांनी एकच टाहो फोडला.. मगरे कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच सरकली… तातडीने मगरेंनी पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना माहिती दिली.. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बागुल यांच्यासह पोलीस नाईक अजय पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली… नंदुरबार येथून श्वानपथक मागवून मागवा घेण्याचा प्रयत्न सुरू केला… रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.. अशा घटनांमध्ये वारंवार वाढ होत असल्याने नागरिकांमधून सुरक्षेचा प्रश्न पोलिसांच्या बाबतीत विचारला जातोय? तात्काळ या घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपींना जेरबंद करावे ही मागणी गोपाळ नगर मधील वसाहतीतील नागरिकांनी केलीये.. त्यामुळे आता तळोदा पोलीस नेमकं काय शोध घेतात आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे..
नितीन गांगुर्डे, तळोदा ग्रामीण प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार