Breaking : शिंदे गटाच्या मंत्र्यांची ती क्लिप व्हायरल, धक्कादायक..

छत्रपती संभाजी नगर- 23/6/23

शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांच्यावर एका कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्याचा आरोप होत आहे… या संदर्भातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.. मुलाबद्दल अपशब्द काढल्यामुळे संदिपान भुमरेंकडून शिवीगाळ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.. मात्र दुसरीकडे हा आवाज आपला नसल्याचा दावा संदिपान भुमरे यांनी केला आहे…

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ज्या तरुणाला शिवीगाळ करण्यात आली आहे त्याचं नाव बाबा साहेब वाघ असा आहे…

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… |

काय आहे प्रकरण? 

संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील दरकवाडी गावात बाबासाहेब वाघ नावाचा तरुण राहतो. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याच्या गावात रस्त्याचे काम सुरु झाले होते. मात्र रस्ता न करताच पैसे उचलण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. तर हे काम संदिपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांचे असल्याचे गावातील लोकांनी सांगितल्याने आपण भुमरे यांच्या पीए यांना फोन करून कामाबद्दल विचारणा केली होती, असं मारहाण झालेल्या तरुणाचे म्हणणे आहे. दरम्यान, याचाच राग आल्याने भुमरे यांनी या तरुणाला शिवीगाळ केली. तसेच तुझ्या घरी येतो, असे म्हणाले. त्यामुळे आपण प्रचंड दहशतीत  असल्याचं तरुणाने म्हटले आहे. 
त्यामुळे शिंदे गटाच्या या मंत्राची क्लिप व्हायरल झाल्याने शिंदे गटाच्या या नेत्याची डोकेदुखी अधिकच वाढणार हे तेवढेच खरे मानले जाते..
एम डी टीव्ही न्यूज ब्युरो ,छत्रपती संभाजी नगर

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here