Breaking – संजय राऊत यांना मोठा झटका… कोर्टाने दिला थेट निर्णय..

0
233

मुंबई :-22/6/23

Sanjay Raut case against Twitter: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. राऊत यांनी ट्विटर विरोधात दाखल केलेला खटला कोर्टाने रद्द केला आहे. याप्रकरणी आदेश देताना कोर्टाने राऊतांना खडेबोलही सुनावले आहेत. या प्रकरणाने कोर्टाचा विनाकारण वेळ घेतला, असं मुख्य महानगर दंडाधिकारी, किल्ला कोर्ट संग्राम बाळासाहेब काळे म्हणाले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी 2021 मध्ये डॉक्टर स्वप्ना पाटकर यांच्या ट्विटर हँडलवर त्याचप्रमाणे इतर सोशल मीडिया खात्यावरील ट्विट रद्द करण्याचा दावा केला होता
हा दावा बुधवारी एस्पलनेड दंडाधिकारी न्यायालयाने रद्द केला
आपली बदनामी केलेल्या व्यक्तींची सोशल मीडिया पोस्ट काढून टाकाव्यात अशी मागणी संजय राऊत यांनी कोर्टात केलेली होती… रावतांचे वकील सतत गैरहजर राहत असल्याने हा दावा प्रलंबित ठेवून काहीच उपयोग नाही असे कोर्टाने म्हटले.. त्यामुळे कोर्टाने पुन्हा संजय लावताना एक दंडकाच दिलाय..

हे सुध्दा वाचा

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

संजय राऊत यांनी एप्रिल २०२१ मध्ये हा खटला दाखल केला होता. राऊत यांनी त्यांच्या विरोधातील आक्षेपार्ह ट्विट्स, तसेच गुगल, यूट्यूब अपमानकारक मजकूर हटवण्याची मागणी केली होती. मात्र ७ एप्रिल २०२२ पासून संजय राऊत आणि त्यांचे वकील प्रत्येक तारखेस गैरहजर राहिले आहेत. असं निरिनिक्षण कोर्टाने याचिका फेटाळताना नोंदवलं आहे.कोर्टाने म्हटलं आहे की, खटला प्रलंबित ठेऊन काही साद्य होणार नाही. या प्रकरणाने कोर्टाचा विनाकारण वेळ घेतला. असं म्हणत मुख्य महानगर दंडाधिकारी बाळासाहेब काळे यांनी हा खटला रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट एम डी टी व्ही न्यूज मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here