BREAKING… महाराष्ट्रात तुफान राडा … आदिपुरुषचे शो बंद

0
426
BREAKING

मुंबई :- ‘BREAKING आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा देशभरात चर्चेत आहे. कुठे या या सिनेमावर टीका, विरोध होत आहे. तर कुठे तोडफोडही करण्यात येत आहे. मुंबईसह आता पालघर जिल्ह्यातील नालासोपारामधील (Nalasopara) मधील एका सिनेमागृहातील ‘आदिपुरुष’ चा शो हिंदू संघटनांनी बंद पाडला आहे. कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये राडा घालून आदिपुरुषचं स्क्रिनिंग बंद पाडलं आणि घोषणाबाजी केली. यावेळी मल्टिप्लेक्सचे कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्याच शाब्दिक बाचाबाची झाली.

BREAKING

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

‘आदिपुरुष’मधील डायलॉग्सवर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर अखेर निर्मात्यांनी ते संवाद बदलणार असल्याचं जाहीर केलं. आठवडाभरात चित्रपटातील संवाद बदलले जातील, अशी माहिती देण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये “आमच्या देवाचा अपमान झालेला आम्ही सहन करू शकत नाही, तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का?, आमच्या देव-देवतांचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणार, फासावर चढावं लागलं तरी चालेल पण अपमान सहन करणार नाही”. असे महंत अनेकांनी बॉलिवूडविरोधात घोषणाही दिल्या आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झाला आहे. रामायण या महाकाव्यापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवल्याची प्रतिक्रिया लेखक मनोज मुंतशीर यांनी दिली. मात्र त्यातील कलाकारांच्या तोंडी असलेले डायलॉग हे अत्यंत ‘टपोरी’ भाषेतील असल्याची टीका नेटकरी करत आहेत.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

रामायणासारख्या महाकाव्यातील पात्रांना दिलेला लूक, व्हीएफक्स आणि डायलॉग्सवरून सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. या चित्रपटातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप काही हिंदू संघटनांनी केला आहे. याच कारणामुळे रविवारी नालासोपाऱ्यातील मल्टिप्लेक्समध्ये हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी ‘आदिपुरुष’च्या स्क्रिनिंगदरम्यान गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये राडा घालून आदिपुरुषचं स्क्रिनिंग बंद पाडलं आणि घोषणाबाजी केली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

‘आदिपुरुष’ सिनेमातील रावणाची भूमिका, हनुमानाच्या भूमिकेकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पण सिनेमात रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखा पाहून कॉन्ट्रोव्हर्सीला सुरुवात झाली आहे. तसेच हा सिनेमा अतिभव्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा पाहताना प्रेक्षक मात्र नाराज झालेले दिसून येत आहेत.

वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची दमदार कमाई

पहिल्या दिवशी आदिपुरुष या चित्रपटाचा जगभरातील कमाईचा आकडा तब्बल १४० कोटी रुपये इतके होता. पहिल्या वीकेंडच्या परीक्षेतही हा चित्रपट पास झाला असून आतापर्यंत कमाईचा ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NEW

नेपाळमध्ये ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनावर बंदी

आजपासून (१९ जून) काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी लागू करण्यात आली आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सीतेचा उल्लेख ‘भारत की बेटी’ म्हणून केल्याने हा वाद सुरू झाला आहे. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनी काठमांडू महानगर क्षेत्रातील सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याला पाठिंबा दिला आहे. ‘आदिपुरुष’मधील तो संवाद न काढता चित्रपट प्रदर्शित केल्यास कधीच भरून न निघणारं नुकसान होईल, असं ते म्हणाले. ‘जानकी भारत की बेटी है’ हा संवाद अद्याप चित्रपटात तसाच असल्यामुळे आजपासून काठमांडूमध्ये सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.

एमडीटीव्ही न्युज ब्युरो, मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here