BREAKING NANDURBAR:तुफान दगडफेक; एका वाहनासह घराचे नुकसान, पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात
शहरातील भरवाड गल्लीत किरकोळ कारणावरून दोन गट समोरासमोर येऊन तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत एका चारचाकी वाहनासह एक घराच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.
भरवाड गल्ली परिसरात आज किरकोळ कारणावरून दोन गटात दगडफेक करण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

माहिती कळतच नंदुरबार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील भरवाड गल्ली परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. या वादातून एका गटाकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या गटानेही दगडफेक केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्नेहदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, गुन्हा शोध पथकाचे पोलीस कर्मचारी दंगा नियंत्रण पथक यांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रनात आहे.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह !
परिस्थितीवर नियंत्रण असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे. दगडफेक करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून गुन्हा दाखल करण्याचे काम शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.
एम डी टी व्ही ब्युरो ,नंदुरबार