BREAKING : पंतप्रधानांच्या निशाण्यावर अखेर कोण ? केले भ्रष्टाचाराचे आरोप..

0
263

पुणे -२७/६/२३

भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी [ Narendra Modi ]यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पाटण्यामध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसंच शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असंही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘पंतप्रधानांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे, याचा नमुना देशासमोर ठेवला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वत: विचार करण्याची गरज आहे. शिखर बँकेचा उल्लेख त्यांनी केला, मी कधीही शिखर बँकेचा मेंबर नव्हतो. मी कधी लोन घेतले नव्हते, मी त्या संस्थेचा सदस्य नव्हतो. याबाबत बोलणं कितपत ठिक आहे?’, असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.

 WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0

सिंचनाबाबत त्यांनी वक्तव्य केलं, मात्र ते खरं नाही. त्यांनी जो उल्लेख केला त्यात शिखर बँक प्रकरण न्यायालयात गेलं आहे, त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. सुप्रिया सुळे यांचं नाव ङेतलं त्याचं काही कारण नाही. अशा संस्थांसोबत त्या राहत नाहीत, हे बहुतांश लोकांना माहिती आहे,’ असं शरद पवार म्हणाले.

‘मोठ्या प्रमाणावर देशातील विरोधी पक्षाचे लोक एकत्र येत आहेत, देशाच्या समस्येबाबत चर्चा करत आहेत. ही गोष्ट काही लोकांना पटत नाही, त्यामुळे अशा पद्धतीची विधानं केली जात आहेत, यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही,’ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी[ Sharad Pawar] दिली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

‘राष्ट्रवादी काँग्रेसवरही जवळपास 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खनन घोटाळा, यांची यादीही बरीच मोठी आहे. या पक्षांच्या घोटाळ्याचा मीटर कधी डाऊनच होत नाही. या पक्षांकडे घोटाळ्यांचाच अनुभव आहे. यांची एकच गॅरंटी आहे, ती म्हणजे घोटाळ्याची गॅरंटी. गांधी परिवाराच्या मुला-मुलीचा विकास करायचा असेल तर काँग्रेसला मत द्या, मुलायम सिंग यांच्या मुलाचं भल करायचं असेल तर समाजवादी पार्टीला व्होट द्या. लालूंच्या मुलांचं भल करायचं असेल तर आरजेडीला मत द्या. शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, पण तुम्हाला तुमच्या मुलाचं भलं करायचं असेल तर मत भाजपला द्या,’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here