नाशिक : 28/6/23
मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कार्यालयाचा ताबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे देण्याचा निर्णय घेतलाय..
त्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय.. कामगार सेनेची मंगळवारी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.. यात अध्यक्षपदी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची निवड करण्यात आली… त्यामुळे कामगार सेनेचे महापालिकेतील कार्यालय ठाकरे गटाकडेच राहणार असल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती…
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
बापरे… पुण्यात पुन्हा एका मुलीवर जीवघेणा हल्ला…! | MDTV NEWS
Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS
या कार्यालयाच्या ताब्यावरून ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये कायम वादाची ठिणगी पडायची मात्र न्यायालयानेच हा निर्णय ठाकरे गटाच्या बाजूने दिला त्यामुळे शिंदे गटात साठी नाशिकच्या हा फार मोठा धक्का मानला जातो..
तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्यूज नाशिक