Buldhana News : खामगावमधील 459 किलो गांजा नष्ट..!

0
95

Buldhana News – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 31 डिसेंबर 2023 रोजी जप्त केलेल्या जवळपास 459 किलो गांज्या ( 459 kg of ganja destroyed in Khamgaon ) न्यायालयाच्या आदेशाने आज 4 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास एमआयडीसी मधील ( wise ecocare And farmtech And Pvt Ltd ) या कंपनी मध्ये समक्ष नष्ट करण्यात आला.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, होम डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक जयंत सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पंच सुरेश इंगळे आणि वाळके, तसेच कंपनी चे मालक श्री हर्षद हेंड पाटील, व्यवस्थापक सचिन हवालदार यांची उपस्थिती होती.

buldhana-news-459-kg-of-ganja-destroyed-in-khamgaon

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका व्यक्तीकडून 31 डिसेंबर 2023 रोजी 459 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी फरार असल्याने त्याच्यावर अजूनही अटक झालेली नाही.

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

न्यायालयाने या गांज्याचा नाश करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज एमआयडीसी मधील wise ecocare And farmtech And Pvt Ltd या कंपनी मध्ये गांज्याचा नष्ट करण्यात आला.

buldhana-news-459-kg-of-ganja-destroyed-in-khamgaon

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी सांगितले की, गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. यापूर्वीही अनेक मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.

Mdtv साठी पुरुषोत्तम कौसकार – बुलढाणा प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here