Buldhana News – बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 31 डिसेंबर 2023 रोजी जप्त केलेल्या जवळपास 459 किलो गांज्या ( 459 kg of ganja destroyed in Khamgaon ) न्यायालयाच्या आदेशाने आज 4 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास एमआयडीसी मधील ( wise ecocare And farmtech And Pvt Ltd ) या कंपनी मध्ये समक्ष नष्ट करण्यात आला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, होम डिव्हिजनचे पोलीस उपअधीक्षक जयंत सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पंच सुरेश इंगळे आणि वाळके, तसेच कंपनी चे मालक श्री हर्षद हेंड पाटील, व्यवस्थापक सचिन हवालदार यांची उपस्थिती होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका व्यक्तीकडून 31 डिसेंबर 2023 रोजी 459 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी फरार असल्याने त्याच्यावर अजूनही अटक झालेली नाही.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
न्यायालयाने या गांज्याचा नाश करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज एमआयडीसी मधील wise ecocare And farmtech And Pvt Ltd या कंपनी मध्ये गांज्याचा नष्ट करण्यात आला.
- Telecom Company Caller ID: १ नोव्हेंबरपासून नवा नियम! कॉल आल्यावर स्क्रीनवर दिसणार ‘हे’ नाव; वाचा संपूर्ण माहिती…!
- RBI Bank Emirates NBD Merger: आरबीआयची मोठी मंजुरी ; दोन प्रमुख बँकांचे होणार विलिनीकरण; ग्राहकांवर काय होणार परिणाम?
- Dhangar Reservation Protest Dhule: धुळ्यात धनगर आरक्षणासाठी हजारोंचा एल्गार! दीपक बोराडेंच्या नेतृत्वात भव्य मोर्चा
- Niharika Koli Death Case: धुळ्यात आदिवासी टोकरे कोळी समाजातर्फे रस्ता रोको; CBI चौकशीची मागणी..!
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी सांगितले की, गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. यापूर्वीही अनेक मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे.
Mdtv साठी पुरुषोत्तम कौसकार – बुलढाणा प्रतिनिधी

