शहादा :२८/३/२३
शहादा तालुक्यात आहे ब्राह्मणपुरी हे गाव..
या गावात नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांची पावले वळू लागली ती शेतीकडे..
भारत हा शेतीप्रधान देश.. म्हणतात ना सर्वांचा पोशिंदा तो शेतकरी
व्होईस
या गावातील लक्ष्मीकांत बुला पाटील अनेक वर्षांपासून नोकरी सोबत शेती करताय..
त्यामुळे नोकरी सोबत शेती व्यवसाय करावा हे देखील त्यांना वाटू लागलं…
केळी लागवड करून खर्चापेक्षा चार पट जादा उत्पन्न त्यांनी या व्यवसायात शेतीत मिळवलं..
त्यांच्या केळांना सौदी अरेबिया मध्ये मागणी मिळाली.. त्यामुळे अभिमानाने सांगावस वाटतं त्यांची केळी ही आखाती देशात सर्वदूर पोहोचायला सुरुवात झाली.. प्रति झाडाला शंभर रुपये खर्च आला असून उत्पन्न पाचपट निघाले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली ..
केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत तर दुसरीकडे मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने रमजान महिना आणि इतर सण उत्सवात केळीचे दर वाढतील असा त्यांनी अंदाज व्यक्त केलाय..
दहा एकर क्षेत्रात 12000 केळी रोपांची लागवड केली…
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
चांगला भाव मिळत असल्याने त्यांना चाळीस लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असून त्यांची केळी थेट आखाती देशात निर्यात होते…
श्याम पवार, शहादा प्रतिनिधी ,एम.डी .टी.व्ही. न्यूज