फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन..

0
132

नंदुरबार -३/४/२०२३

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait. gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.

या घटकांत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकु, संत्रा, मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.

फुले घटकांत कट फ्लॉवर्ससाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकरऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.

कंदवर्गीय फुलेसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 1 लाख 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमान 60 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.

तर सुटी फुलेसाठी अल्प भूधारक शेतकऱ्यास 40 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 16 हजार प्रति हेक्टर अनुदान तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 10 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.

मसाला पिक लागवड घटकांत बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास 30 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार प्रति हेक्टर अनुदान तर बहुवर्षीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास 50 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार प्रति हेक्टर अनुदान देण्यात येईल.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

विदेशी फळपिक लागवड घटकांत ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवी फळासाठी शेतकऱ्यास 4 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 60 हजार प्रति हेक्टर अनुदान तर स्ट्रॉबेरी फळासाठी शेतकऱ्यास 2 लाख 80 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लाख 12 हजार प्रति हेक्टर अनुदान तसेच पॅशनफ्रुट, ब्युबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडो फळासाठी शेतकऱ्यास 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेत एकूण खर्चांच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रुपये अनुदान देण्यात येते. तर जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यास 40 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेत खर्चांच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येते.

तरी या घटकांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रविण चव्हाण, एम. डी. टी.व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here