नंदुरबार : २४/३/२३
येत्या मार्च अखेर एप्रिल महिन्यात विविध धार्मिक सण,जयंती,उत्सव येऊ घातलेत .. त्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली .
हि बैठक शहाद्यात पार पडली ..
रमजान ईद,रामनवमी, महावीर जयंती ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे उत्सव आगामी काळात साजरी करण्यात येत असून त्या अनुषंगाने आज अन्नपूर्णा मंगल कार्यालय इथं शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
यावेळी अप्पर पोलीस अधक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधीक्षक श्रीकांत घुमरे, तहसीलदार डा मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी महेश शेलार,नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे,पोलीस निरीक्षक राजन मोरे तसेच शांतता कमिटीचे सदस्यसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शहादा हे शांतिप्रिय शहर असून येणाऱ्या उत्सवात समाजकंटकाच्या माध्यमातून गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी मिळून सतर्कतेने राहून उत्सव सण साजरे करावे
व अनुचित प्रकार घडणार नाहीत याकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे असा सूर बैठकीतून उमटला ..
बैठकीत वाहतूक कोंडी सुरळीत करणे, विद्युत पुरवठा सुरळीत करणे,तसेच मिरणुकीचे मार्ग नेहमीप्रमाणे असणार आहेत व शासनाच्या अटी शर्ती नुसार उत्सव साजरा करण्यात येणार आहेत.
तसेच वेगवेगळे मुद्दे चर्चेला आले ..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/36S6BFu
येणाऱ्या काळात त्याचे पूर्ण निराकरण करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा देण्यात आले.
तसेच डी जेला पूर्णतः बंदी असणारच आहे परंतु पारंपरिक वाद्य चालना देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे या बैठकीत प्रशासन मार्फत सांगण्यात आलं ..
शहादाहून संजय मोहिते,तालुका प्रतिनिधी, एम. डी. टी. व्ही. न्यूज