Chagan Bhujbal:येवला मतदारसंघातील रस्ते व पुलांची कामे मार्गी लागणार..

0
284

नाशिक -१८/७/२३

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदार संघातील ३६ कोटी ४४ लक्ष २३ हजार रुपयांच्या रस्ते, पुलांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येवला मतदार संघातील रस्त्यांना आणि पुलांची अनेक कामे मार्गी लागणार असून नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मतदार संघातील विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. येवला मतदार संघात गेल्या काळात काही रस्त्यांची व पुलांची दुरवस्था झाल्याने या रस्त्यांची व पुलांची सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी त्यांनी पुरवणी अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार येवला तालुक्यातील अनकाई-कुसमाडी-नगरसूल-अंदरसूल ते पिंपळगाव जलाल रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, वापी-पेठ-नाशिक-निफाड-येवला-वैजापूर-औरंगाबाद-जालना रस्ता प्रमुख राज्य मार्ग २ या रस्त्यासाठी २ कोटी ९० लक्ष, येवला-नागडे-धामणगाव-धोमोडे-बिलोनी ते ७५२ जी रस्त्यावर मध्ये संरक्षण भिंत बांधण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, अहमदनगर जिल्हा हद्द पढेगाव अंदरसुल-न्याहारखेडा-रेंडाळे-ममदापूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ७७ रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी १ कोटी ८० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे हि वाचा :

Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..

MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…

NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..

येवला तालुक्यातील विखरणी-कानडी-पाटोदा-दहेगाव-जऊळके-मुखेड फाटा-सत्येगाव ते धामोरी प्रमुख जिल्हा मार्ग १९५ रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष, गोपाळवाडी-अनकुटे धामोडे राज्य महामार्ग २५ ते मातुलठाण-सायगाव-अंगुलगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग ७८ प्रमुख जिल्हा मार्ग १५९ रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ३ कोटी, येवला-पारेगाव-निमगावमढ-महालखेडा-भिंगारे-पुरणगाव ते प्रमुख राज्य मार्ग २ रस्ता रुंदीकरण करण्यासह मजबुतीकरण करण्यासाठी २ कोटी, पाटोदा-सातारे-एरंडगाव-रवंदा प्रमुख जिल्हा मार्ग १७८ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, मनमाड-इकवाई-मोहेगाव-भालूर-लोहशिंगवे-राजापूर-ममदापूर-खरवंडी-कोळम-भारम रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ७६ या रस्त्यासाठी १ कोटी ५० लक्ष, अनकाई-नायगव्हाण-पिंपळखुटे-राजापूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ७० वर पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ४६ लक्ष ७५ हजार तर अनकुटे मातुलठाण तळवाडे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १५९ वर लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी १४ लक्ष ५० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर निफाड तालुक्यातील लासलगाव पाटोदा रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी ४ कोटी, पाचोरे मऱ्हळगोई विंचूर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ९० लक्ष, देवगाव ते देवगाव फाटा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १२६ वर स्लॅबड्रेनचे बांधकाम करण्यासाठी ९० लक्ष, ब्राम्हणगाव वनस ते वनसगाव एमडीआर -१७५ वर मोठा पूल बांधण्यासाठी ३ कोटी ८२ लक्ष रुपयांच्या कामांचा पुरवणी अर्थसंकल्पामध्ये समावेश झाला आहे.

मंडल अधिकारी कार्यालय व निवासस्थान बांधकामासाठी ४५ लक्ष:

येवला मतदारसंघातील लासलगाव, विंचूर व देवगाव येथील मंडल अधिकारी कार्यालय व निवासस्थान बांधकाम करण्यासाठी पुरवणी अर्थसंकल्पातून ४५ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना महसुली सेवा मिळविण्यासाठी अधिक मदत होणार आहे.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here