पेढ्यांचे वाटप ; फटाक्यांच्या आतिषबाजीसह ढोलताशांच्या गजर
नंदुरबार – मदत, पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्तीने आमदार कार्यालय परिसरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
बुधवारी दुपारी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत जाहीर केली. त्यात नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. नवनियुक्त पालकमंत्री अनिल पाटील यांचे नंदुरबारात असंख्य चाहते व कार्यकर्ते असल्याने आमदार कार्यालय परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांसह जल्लोष केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, पं.स प्रभारी सभापती प्रल्हाद राठोड, बाजार समिती सभापती विक्रमसिंग वळवी,माजी नगरसेवक परवेज खान, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, रवींद्र पवार, जगन माळी, चेतन वळवी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील,शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे,फरीद मिस्तरी, फारुख मेमन, धर्मेंद्र परदेशी,गजानन पाटील,दीपक मराठे, देवा राजपूत, नितीन नागरे, राजेश वसावे, कृष्णा राजपूत,पंडित पाटील,प्रकाश पाडवी, नीरज तजवीज,दीपक पाटील यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.