शिंदखेडा/धुळे -३/५/२३
येथील रहिवाशी देविदास चौधरी त्यांचा नातू आदित्य चौधरी यांनी आपला वाढदिवस वृक्षरोपण करून साजरा केला.
नातूचा वाढदिवस 1 मे व श्री देविदास चौधरी यांचा वाढदिवस 2 मे रोजी असतो.
शिंदखेडा येथील वरूळ रोड वरील श्री स्वामी समर्थ केंद्रात वड, निंब या रोपांची लागवड करून वाढदिवस साजरा केला.
लागवड केलेल्या रोपांना संवर्धन पिंजरे लावून संवर्धनाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला
दर वर्षी आजोबा व नातू आपला वाढदिवस वृक्षरोपणांने साजरा करतात.
या अगोदर त्यांनी विरदेल रोड परिसर, साईलीला नगर येथे वृक्षरोपण करून संवर्धन केले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
त्यांनी सिसम, करंज, पिंपळ, निंब या रोपांची लागवड केली आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून याचा परिणाम वातावरणावर होत आहे.
अवकाळी पाऊस पडणे, गारा पडणे अश्या निसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.
सर्वांनी आपल्या वाढदिवसानिम्मित एक रोपाची लागवड करून संवर्धन केले तर निश्चितच काही प्रमाणात नैसर्गिक आपत्तीला आळा बसेल. असे आवाहन चौधरी यांनी केले.
शिंदखेडा येथील वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष योगेश चौधरी यांचे ते वडील व मुलगा आहेत.
यावेळी वृक्षसंवर्धन समितीचे योगेश चौधरी, राजेंद्र मराठे, भूषण पवार, जीवन देशमुख, मनोज चौधरी, सुनील चौधरी, यश मराठे, प्रदीप चतुर्वेदी,धनराज निकम, भडणे येथील सरपंच गिरीष देसले, श्री स्वामी समर्थ केंद्राचे केंद्रप्रमुख प्रशांत पाटील, सेवेकरी सागर देसले, नंदकिशोर पाटील, अमोल निकम, योगेश कुवर, जयराम माळी, चेतन देशमुख, कदम नाना उपस्थित होते.
या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय ..
सगळ्यांना लाजवेल आणि विचार करायला लावेल हा उपक्रम कारण वाढदिवस म्हणजे आज पार्टी,पैशाची नाहक उधळपट्टी , दारूत बुडणे या चुकीच्या परंपरा रूढ होऊ पाहताय यात हा उपक्रम राबवून वृक्षांप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं या कुटुंबाने ..
एम डी टी व्ही वाहिनीकडून आपणास शुभेच्छा ..
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज