”या” जिल्ह्यात बालविवाह रोखण्यात बालसंरक्षण समितीस यश..

0
210

धुळे : १६/३/२३

जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद म्हणून अनेक नागरीक स्वत:हून पुढे येऊन बाल विवाहाबाबत प्रशासनास माहिती देत आहे.

Collector Jalaj Sharma and Chief Executive Officer of Zilla Parishad Bhuvaneshwari S. Under the guidance of Dr. In response to that, many citizens are coming forward and informing the administration about child marriage.

नागरीकांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरात धुळे जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.

With the cooperation of citizens, the Child Protection Committee has succeeded in preventing four child marriages in Dhule district in the last week. This information has been given by District Women and Child Development Officer Sachin Shinde.

3 मार्च, 2023 रोजी वेहेरगाव फाटा, ता. साक्री याठिकाणी बाल विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाइल्ड लाईन 1098 या हेल्पलाईनवर प्राप्त झाली होती.

On March 3, 2023 Vehergaon Phata, The confidential information about a child marriage taking place in Sakri was received on the helpline Child Line 1098.

त्याअनुषंगाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश नेरकर, परिवीक्षा अधिकारी, सतिश चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी समन्वय साधुन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील देवेंद्र मोहन, संरक्षण अधिकारी (संस्थाबाहय) ज्ञानेश्वर पाटील, चाईल्ड लाईन प्रतिनिधी यांची टिम तयार करून संबंधित गावाचे पोलीस पाटील, ग्रामसेवक अमोल भामरे, सरपंच यांचेशी संपर्क साधला.

Accordingly, under the guidance of District Women and Child Development Officer Sachin Shinde, Rakesh Nerkar, Probation Officer, Satish Chavan, District Child Protection Officer coordinated with Devendra Mohan of District Child Protection Unit, Protection Officer (External) Dnyaneshwar Patil, Child Line representative and formed a team of the concerned village. Contacted Police Patil, Village Sevak Amol Bhamre, Sarpanch.

निजामपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी वेहेरगाव येथील प्रकरणात तात्काळ दखल घेऊन पोलीस कॉस्टेबल रतन मोरे यांचेसोबत या कार्यालयाच्या टिमने वेहेरगाव येथे भेट देऊन कार्यवाही करण्यात आली.

Police Inspector Hanumant Gaikwad of Nizampur Police Station took immediate notice of the case at Vehergaon and the team of this office visited Vehergaon along with Police Constable Ratan More.

दुसऱ्या प्रकरणात नागसेन नगर, देवपूर, धुळे येथे बालविवाह होत असल्याची तक्रार देवपूर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार एम. डी. निकम, पोलीस निरीक्षक, देवपुर पोलीस स्टेशन, धुळे यांनी या प्रकरणात तात्काळ दखल घेऊन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सौ. तृप्ती पाटील, संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशनचे सागर थाटसिंगार, सुनिल गवळे, रोहिदास अहिरे, एस. एस. पाटील, दिलीप वाघ, बी. वाय. नागमल, ए.व्ही. जगताप यांच्या सहकार्याने बालविवाह रोखण्याची कार्यवाही करण्यात आली.

In all cases, a complaint was received at Devpur Police Station that child marriages were taking place in Nagsen Nagar, Devpur, Dhule. According to M. D. Nikam, Police Inspector, Devpur Police Station, Dhule took immediate notice of this case and Ms. from the District Child Protection Unit. Tripti Patil, Defense Officer (Institutional) Sagar Thatsingar, Sunil Gawle, Rohidas Ahire, Devpur Police Station, Dhule City. S. Patil, Dilip Wagh, b. Y. Nagmal, A.V. Actions were taken to prevent child marriage with the help of Jagtap.

संबंधित बालविवाह होणाऱ्या ठिकाणी बालक व बालिका यांचा जन्मपुरावा तपासणी करुन बालिका 18 वर्षाखाली असल्याचे खात्री पटविल्यानंतर लगेच लग्न घरी वर पक्ष व वधु पक्ष यांना एकत्र बसवुन बाल विवाह बाबतचे दुष्परिणाम व बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्यात आली

After checking the birth certificate of the child and the girl at the place where the child marriage takes place and confirming that the girl is under 18 years of age, the groom and the bride were seated together at the wedding house and informed about the consequences of child marriage and the action to be taken according to the Prevention of Child Marriage Act, 2006.

व संबंधितांना बाल कल्याण समिती, धुळे यांचेसमोर उपस्थित करुन मुलीच्या वडीलांकडून मुलीचे १८ वर्ष वय पुर्ण होईपर्यंत बालिकेचा विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.

And the concerned persons were brought before the Child Welfare Committee, Dhule, and the father of the girl wrote an undertaking that he will not marry the girl until she reaches the age of 18 years and the girl was counselled.

या तिन्ही ठिकाणच्या बालविवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व एम. टी निकम, पोलीस निरीक्षक, देवपुर पो स्टे, धुळे व हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक, निजामपुर, ता. साक्री यांच्या तात्काळ कार्यवाहीमुळे तसेच राकेश नेरकर, सतिश चव्हाण यांनी समन्वय साधुन सौ. तृप्ती पाटील, देवेंद्र मोहन, ज्ञानेश्वर पाटील, देवपुर पोलीस स्टेशनचे आणि निजामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच वेहेरगाव येथील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने वेहेरगाव येथील 2, शहरातील 1 आणि मालपुर येथील 1 असे एकुण 4 अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखण्यात प्रशासनास यश आले आहे. असेही श्री. शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

The action to prevent child marriage in these three places was under the guidance of Collector Jalaj Sharma and Chief Executive Officer Buvaneshwari S., District Women and Child Development Officer Sachin Shinde and M. T Nikam, Inspector of Police, Devpur Post Station, Dhule and Hanumant Gaikwad, Inspector of Police, Nizampur, Tt. Due to Sakri’s immediate action and coordination by Rakesh Nerkar, Satish Chavan, Mrs. With the cooperation of Tripti Patil, Devendra Mohan, Dnyaneshwar Patil, police personnel of Devpur Police Station and Nizampur Police Station, as well as Sarpanch, Village Sevak, Police Patil of Vehergaon, the administration has succeeded in preventing child marriage of 4 minor girls namely 2 in Wehergaon, 1 in the city and 1 in Malpur. . Also Mr. Shinde said in the publicity sheet.

जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here