बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून गिरवणार कलावंत बालनाट्याचे धडे..

0
151

नंदुरबार : – येथे मे महिन्यात गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे व बालनाट्य परिषद नंदुरबार जिल्हा शाखा यांच्यावतीने बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

094b83bba6462868724ea9d5964ea7c0

नंदुरबार येथे गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे व बालरंगभूमी परिषद, नंदुरबार जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनयाची पाठशाळा अंतर्गत हसत खेळत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. २ मे ते ८ मे २०२३ दरम्यान नंदुरबार शहरातील एस.ए.मिशन हायस्कूलच्या जिमखान्यात करण्यात येणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या बालनाट्य प्रशिक्षणात ८ ते १६ या वयोगटातील बालकलावंतांचा सहभाग असणार असून सदर बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात ४० बालकलावंतांना सहभाग मिळणार आहे.

या नाट्यप्रशिक्षण अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बालकलावंतांना नाट्य अभिनयासोबतच नाटकातील विविध अंगांची ओळख होणार आहे.

तसेच या नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून नाटकातील विविध अंगांची व तांत्रिक बाबींची ओळख होणार असून त्यासोबतच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हे बालनाट्य प्रशिक्षण शिबीर उपयोगी ठरणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त बाल कलावंतांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन गाडगेबाबा शैक्षणिक सांस्कृतिक सेवा मंडळ व बालनाट्य परिषद नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर- ९९२३१२९७८२, राजेश जाधव- ९९२२०३३५११, राहुल खेडकर- ९४२२७८७३३५, मनोज सोनार- ९०४९७७३१६७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here