शिंदखेडा : २८/२/२०२३
या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिंदखेडा शहरातील शिरपूर रोड लगत असलेल्या साईड पट्ट्यांची दुरावस्था विभागाच्या भोंगळ कारभाराचं प्रतीक मानलं जातं
शिवाजी चौफुली पासून पाटण पुलापर्यंत सुमारे 500 मीटर अंतराच्या मुख्य रस्त्यावर साईड पट्ट्यांवरील गटारीतील ढापे टाकले नसल्याने वाहन व पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागतोय.
वंचित चे तालुका अध्यक्ष अजय पानपाटील यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात.. वरिष्ठांकडे आणि विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील तक्रारींकडे विभाग दुर्लक्ष करतो..
अधिकाऱ्यांची पाठ फिरते.. सदर गटार देखील उघड्यावर असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.. विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेत.
या साईड पट्ट्यात गटारीवर ढापे टाकले जावे शिवाय उघड्यावर असलेल्या गटारीमुळे वराहाचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो.
त्यामुळे एकूणच परिसरातील नागरिक विभागाच्या या कारभारावर नाराज असून संतप्त झालेत.
लवकरात लवकर समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा या तक्रारीच्या माध्यमातून देण्यात आला..
विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारी पगाराव्यतिरिक्त मलाई खाण बंद करावं आणि जनतेच्या हिताची काम करावी..
यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी एम.डी टी.व्ही न्यूज..