विरार -२१/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 फुलपाडा परिसरात होतोय अनियमित व अपुरा पाणीपुरवठा
2 महापालिका प्रशासकांकडून नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष
3 बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी दिलं निवेदन
फुलपाडा परिसर हा वसई विरार महापालिकेच्या अंतर्गत आहे…
या भागात कित्येक महिन्यांपासून पाण्यासारखी अत्यावश्यक गरज आणि ती सुविधा मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
वसई विरार महापालिकेतील नगरसेवकांची मुदत 28 जून 2020 रोजी संपली होती.
नंतर कोविडचा काळ सुरू झाला. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या..
महापालिकेवर प्रशासकीय राजवट बसवली. प्रशासक बसवलेला असताना देखील नागरी सुविधांचा प्रचंड बोजवारा उडाल्याचे दृश्य सध्या तिथं पाहायला मिळत आहे.
सामान्य नागरिकांना लागणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा मिळताना अडचणी येते. पाणीपट्टी कर वेळेवर भरून देखील अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा या भागात होत असल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय.
ही समस्या घेऊन बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी नुकतच आयुक्तांना निवेदन दिलं.
अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठा यामुळे निर्माण झालेली समस्या तात्काळ दूर करावी ही मागणी या निवेदनातून नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी केली..
निवेदन देतेवेळी त्यांच्या समवेत कार्यकर्ते किशोर पाटील हे देखील उपस्थित होते..
अल्पेश पटेल, विरार प्रतिनिधी, एम.डी.टी.व्ही न्यूज