बारावीचा निकाल – पुण्यातून आली अत्यंत दुःखद बातमी

0
313

बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराशेतून विद्यार्थिनीने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना पुण्यातील दापोडी परिसरात घडली. विधार्थिनीने राहत्या घरात गळफास लाऊन आत्महत्या केली. साक्षी राम कांबळे (वय १८ ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. २५ ) रोजी दुपारी घडली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

१२ वीचा निकाल गुरुवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. यावेळी साक्षी घरातून जेवण करून निकाल पाहण्यासाठी बाहेर गेली. निकाल पाहून आल्यानंतर तिला परीक्षेत अपयश आले असून ती नापास झाल्याचे तिने घरच्यांना सांगितले. यावेळी ती काहीशी निराश झाली होती.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तिला निराश पाहून पालकांनी तिच्यावर कुठलाही दबाव आणला नाही. काही हरकत नाही, पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दे, असे तिच्या वडिलांनी समजावून सांगितले. त्यानंतर ती घरात वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली. तिथे तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घरच्यांनी तिला तत्काळ उपोचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, पुणे.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here