नेर /धुळे -२१/६/२३
गटप्रमुख आबा पगारे यांच्या माध्यमातून धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.. एक पुस्तक एक नोटबुक मोहीम हाती घेण्यात आलीशाळेतील लहान चिमुरडे आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आलाअंगणवाडी क्रमांक एक दोन व जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वह्या वाटप करण्यात आलं..
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! |
यावेळी मनोगतात आबा पगारे म्हणाले की, या गावातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडावं या हेतूने त्यांना मोफत पुस्तके व वह्या वाटप करण्याचे ठरवले
विद्यार्थी म्हणजे एखाद्या मडक्याप्रमाणे असून कुंभार जसा मडक्याला आकार तसं देतो त्याप्रमाणेच भूमिका या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांनी बजवावी सोबतच त्यांच्यामध्ये विवेकनिष्ठता नीती आचरण सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी प्रयत्नशील राहावे..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ग्रामविकासात आणि अर्थात शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांचा वाटा सिंहाचा असतो विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता प्रेमाची स्नेहाची भावना बाळगून ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पसरवली त्यांचा वसा पुढे नेण्याचा आवाहन शिक्षकांना यावेळी आबा पगार यांनी केलं..शाळेतले शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी त्यांचे पालक यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केलं..आबा पगारे यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आलं
दिलीप साळुंखे ,एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी ,नेर/धुळे