धुळे -१८/५/२३
साक्री तालुक्यातील म्हसदी येथे गावातील तरुणांना वाचनाची आवड निर्माण व्हावी.
या उद्देशाने येथील सार्वजनिक वाचनालयाला देवरे परिवाराच्या वतीने पन्नास ग्रंथ भेट देण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
येथील प्रगतशील शेतकरी लोटन डोंगर देवरे यांचे सुपुत्र व आर.डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाचे कर्मचारी जितेंद्र देवरे यांनी .पंडितराव देवरे सार्वजनिक वाचनालयाला पाच हजार रुपये किंमतीचे पन्नास ग्रंथ वाचनालयाचे अध्यक्ष नरेंद्र देवरे व सचिव अंजना देवरे यांच्या कडे सुपुर्द केले.
गेल्या दोन वर्षापासून जितेंद्र देवरे तथा परिवाराने परिसरातील शाळा, महाविद्यालयांचं वाचन करायला ग्रंथ व पुस्तके भेट देण्याचा उपक्रम राबवित आहे.
त्यामुळे देवरे परिवाराचे गावातील ग्रामस्थांसह वाचकांनी कौतुक केले आहे.
यावेळी जितेंद्र देवरे,पिंटू मिस्तरी,ज्ञानेश्वर देवरे,रवींद्र निकम,समर्थ कासार, भटु देवरे व वाचनालयाचे सदस्य उपस्थित होते .
यावेळी आभार वाचनालयाच्या ग्रंथपाल नयना देवरे यांनी मानले.
MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे